महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये हवामानाचा अंदाज सर्वांना पुरवणारी कोण व्यक्ती असेल तर ती पंजाब डख हीच आहे. हवामानाचा अंदाज जर म्हटलं तर पंजाब डख हवामान अंदाज हेच प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येते. पंजाब डक म्हणजेच सध्याचे हवामान अंदाजाचे कृषीदूतच आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी पंजाब डख यांना ओळखतो व त्यांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहतो. पंजाब डख हे हवामान अंदाज व्हाट्सअप, युट्युब व या साइट च्या माध्यमातून दर १० ते १५ दिवसातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्या पर्यंत पोहोचवतात.
पंजाब डख यांची हवामान अंदाज देण्याची सुरुवात
पंजाब डख यांना लहानपणापासूनच हवामान अंदाज या विषयांमध्ये रस होता. लहानपणा मध्ये डख व त्यांचे वडील हे हवामान अंदाजाच्या बातम्या पाहत असत. हवामान विभागाच्या अंदाजावर अभ्यास करत त्यांनी त्याच्या नोट्स काढून ठेवल्या. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या हवामान बदलाचा अभ्यास करून आपल्या नोंदी लिहायला सुरुवात केली. त्यांनी सन 1990 पासून हवामान अंदाज विषयी अभ्यास करण्याला सुरुवात केली होती. आजवर ते 32 वर्षे झाले हवामान अंदाज वर निरीक्षण व अभ्यास करतात व हवामान अंदाज देतात. 1996 नंतर त्यांचा हवामान अंदाजाचा अभ्यास वाढल्यानंतर त्यांनी मित्रांना व इतर शेजारच्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज देण्यास सुरुवात केली. व त्यावेळी हळूहळू त्यांचे अंदाज खरे ठरत गेले व सोशल मीडियावर व्हायरल देखील होत गेले. पण त्या काळात इंटरनेट किंवा अँड्रॉइड फोन नव्हते यामुळे पंजाब डख यांना कुठेतरी थांबावे लागत होते.
2014 या साली अँड्रॉइड फोन आल्यानंतर पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाला वेगळेच वळण आले. त्यांनी 2014 सालानंतर व्हाट्सअप वर ३६ जिल्ह्यांची छत्तीस ग्रुप तयार केले व त्यामध्ये हवामान अंदाज पुरवू लागले त्यावेळी शेतकऱ्यांना हे अंदाज आवडत गेले व त्यांच्या अंदाजाला प्रसिद्धी मिळत गेली.
पंजाब डख यांचे सोशल मीडिया साम्राज्य
पंजाब डख यांचे 900+ व्हाट्सअप ग्रुप आहेत. तसेच व्हाट्सअप व युट्युब च्या माध्यमातून पंजाब डख हे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. अगदी फक्त एक दिवसांमध्ये पंजाब डक यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत म्हणजेच ३ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. सध्या पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाची मागणी महाराष्ट्राच्या सिमे बाहेर देखील वाढत आहे महाराष्ट्रात शेजारील कर्नाटकचा जो मराठी पट्टा आहे येथे देखील पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाला चांगलेच ओळखून व आदर देतात. तसेच गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवरील शेतकरी देखील पंजाब डक यांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहतात. पंजाब डक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण जॉईन होऊ शकता.
हवामान अंदाज दर्शविणारी नैसर्गिक चिन्हे
पंजाब डख यांच्यामध्ये निसर्गा मधील बरेच घटक हे हवामानाबद्दल व पावसा बद्दल आपले भाकीत व अंदाज दर्शवत असतात. यांच्याकडील लक्ष देऊन निरीक्षण करणे गरजेचे आहे. आपण या नैसर्गिक चिन्हां द्वारे कोणत्याही सोशल मीडिया व विविध आधुनिक प्रणालींचा वापर न करता हवामान अंदाज हा जाणू शकतो. नैसर्गिक पद्धतीने हवामान जाणून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत. जसे की मुंग्या पक्षी झाडे हे हवामानाचा अंदाज दर्शवत असतात. तसेच वारे व उष्णता यांचा अभ्यास करून देखील आपण हवामानाचा अंदाज घेऊ शकतो असे पंजाब डख यांचे मत आहे. ही लक्षणे कोणकोणते आहेत व कशा पद्धतीने काम करतात हे आता आपण पाहून घेऊया.
पाऊस पडण्याची नैसर्गिक लक्षणे
जर उन्हाळ्यामध्ये सरपटणारे प्राणी हे जास्त बाहेर दिसू लागले तर काही दिवसात पाऊस पडतो. जर मुंग्यांनी आपले घर हे उंच वारूळ तयार केले तर यावर्षी पाऊस जास्त पडण्याची शक्यता असते. चिमण्या जर धुळीमध्ये किंवा फपुट्या मध्ये आंघोळ करत असतील तर काही दिवसात पाऊस पडतो. पंखाचे किडे किंवा मुंग्या रात्रीच्या बंद जवळ येऊन एकत्र होत असतील किंवा घरट्या घालत असतील तर थोड्याच दिवसात पाऊस पडतो. तसेच सूर्यास्त होत असताना पूर्वेकडील आभाळ हे लाल रंगाचे दिसत असल्यास पुढील काही दिवसात म्हणजेच 72 तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते. आकाशा मधून विमान जात असताना जर विमानाचा आवाज हा जास्त प्रमाणात येत असेल, तर पुढील तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असते. कारण आकाशामध्ये पाण्याचे ढग असतात व त्या ढगांना विमानाचा आवाज थाटून तो परत जमिनीकडे येतो म्हणून ज्यावेळेस आकाशामध्ये बाष्प जास्त असतो, त्यावेळेस विमानाचा आवाज जमिनीकडे जास्त येतो.
दुष्काळ पडण्याची नैसर्गिक लक्षणे
पंजाबराव डख यांनी दररोजच्या अभ्यासामधून दुष्काळ पडण्याची देखील नैसर्गिक लक्षणे कोणकोणती आहेत यावर अभ्यास केलेला आहे. जसे की जर कावळ्यांनी झाडाच्या टोकावर आपले घरटे न करता जर जमिनीलगत किंवा जमिनी जवळ आपले घरटे तयार केले तर दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुंग्यांनी आपले वारूळ उंच न करता लहानच ठेवले तर यावर्षी दुष्काळ पडणार आहे असे समजावे. तसेच गावरान आंबे जर शेवटपर्यंत जास्त प्रमाणात पिकले व चांगले राहिले तर त्यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता ही जास्त असते. तसेच जर 15 मे पासून 30 मे पर्यंत एखाद्या ठिकाणी पाऊस पडला नाही व इतर ठिकाणी पडला ,तर ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही, त्या ठिकाणी वर्षभर कमी पाऊस पडतो. तसेच मृग नक्षत्रा वेळी 11 जून च्या आसपास ज्या वेळेस सूर्याकडे बघितल्यानंतर सूर्याभोवती रिंग दिसत असेल तर यावर्षी पाऊस पडण्याची शक्यता ही कमी प्रमाणात असते.
वीज कुठे पडते व विजेपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे.
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजातील अभ्यासामुळे त्यांनी वीज कोठे पडते, कशा पद्धतीने तयार होते व यापासून कसे वाचावे याची माहिती त्यांनी दिलेली आहे. ज्या गावांमध्ये एखादी मंदिर जे उंच आहे व त्यावर पितळेचा कळस आहे असे मंदिर हे गावाचे संरक्षण करते. विज ही विद्युत खांब तसेच इंटरनेट टॉवर अशा उंच विद्युत प्रवाही घटकांवर पडते. तसेच वीज ही उंच झाडांवर व हिरव्या झाडांवर पडते. वीज ही नारळीच्या झाडावर खूप जास्त प्रमाणात पडते कारण ते झाड खूप उंच असते. विजेपासून संरक्षण करण्यासाठी पूर्वीचे लोक आपल्या घरातील तांब्याची भांडी व लोखंडी साहित्य घरापासून लांब टाकत असत त्यामुळे त्या लोखंडी साहित्य मधून व तांब्याच्या भांड्यांमधून वीज प्रवाहित होऊन त्यावर पडलेली वीज ही आकर्षित होऊन जमिनीमध्ये जात होती व पूर्वी लोकांचे संरक्षण होत होते. विजेपासून संरक्षण करण्यासाठी ज्यावेळेस विजांचा गडगडाट होतो यावेळी घरामध्ये जाऊन बसावे. पण यावेळी जर आपण घरामध्ये नसू किंवा दूर शेतामध्ये असून तर त्यावेळेस आपण झाडाखाली किंवा उंच टेकडीवर थांबू नये. यावेळी आपण आपल्या हातामधील किंवा पायांमधील तांब्याची कडी आहे ती काढून टाकावी. व एखाद्या खोलगट ठिकाणी कान बंद करून बसावे. खोलगट ठिकाणी विज पडण्याची शक्यता ही खूप कमी असते.
तर अशाप्रकारे पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यांना हवामान अंदाज देण्याचे योगदान खूपच मोठे आहे, व पंजाबराव डख हे काम अगदी विनामूल्य करतात.