पंजाब डख नवीन हवामान अंदाज
☁️पंजाब डख हवामान अंदाज 29 फेब्रुवारी 2024 पासून चा हवामान अंदाज.राज्यामध्ये एक मार्च व दोन मार्च ला संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.
🌧️या ठिकाणी पावसाची शक्यता
धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा पारोळा यावल तसेच जळगाव भागामध्ये कन्नड बुलढाणा अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यतापश्चिम महाराष्ट्र मध्ये येणारे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार*राज्यामध्ये तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस होईल, जास्त पाऊस होणार नाही.
🌦️*कोकणपट्टी मध्येही एक दोन व तीन मार्चला ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकणामध्ये पावसाची शक्यता नाही.मराठवाड्यामध्ये १,२,३ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी बारीक थेंबांचा पाऊस होईल. जास्त मोठा पाऊस होणार नाही.
☀️पुढील हवामान अंदाज ३ मार्च नंतर हवामान कोरडे राहणार.पुढील काही दिवस महाराष्ट्रातील संपूर्ण हवामान कोरडे राहील.