सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज:
राज्यामध्ये 8 जुलै पर्यंत भाग बदलत दररोज पाऊस पडणार -पंजाब डख
राज्यामध्ये आपण मागच्या अंदाज मध्ये सांगितल्याप्रमाणे दिनांक तीन चार पाच जुलैला ठिकठिकाणी ओढून आले वाहतील असा पाऊस झाला.
???? आपण आधी सांगितले होते की राज्यामध्ये जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल व जुलै पेक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस पडेल. तर त्या पद्धतीनेच जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,
???? राज्यामध्ये अजून 5,6,7 व 8 जुलै राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.
???? जुलै महिन्यामध्ये दरवर्षी पाऊस नसतो. पण यावर्षी जुलै महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, ????
8 जुलै पर्यंतच्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील, पण या काळामध्ये काही शेतकऱ्यांच्या पेरण्या वंचित राहिल्यास,
???? 13 जुलै ते 17 जुलै चे पाच दिवस राज्यामध्ये पुन्हा पाऊस येणार आहे यावेळी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्याही पूर्ण होतील.
जमिनीमध्ये एक इतभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,
????यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,05/07/2023